वंटमुरी गावात एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेला सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी धीर दिला व प्रकृतीची विचारपूस केली.
पीडित महिलेने या घटनेची व्यथा मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासमोर मांडली. पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपींना शिक्षा व्हावी तसेच त्यांना योग्य न्याय देण्याची मागणी मंत्र्यांकडे केली.
दरम्यान, मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पीडित महिला आणि पीडित महिलेच्या कुटुंबीयांची बाजू ऐकून घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
याप्रकरणी पीडित महिलेच्या मुलासोबत पळून गेलेल्या मुलीचे वडील बसप्पा नायक, काका राजू नायक, यल्लाप्पा नायक, भाऊ केम्पण्णा, लक्काप्पा, आई पार्वती, गंगव्वा वालीकर, संगिता हेग्गनायक, शोभा नायक, लक्कव्वा नायक, दोन अल्पवयीन गुन्हेगारांसह १२ जणांविरुद्ध काकती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी सात जणांना काकती पोलिसांनी अटक केली, चार महिला आरोपींना न्यायाधिशासमोर हजर करून आरोपींची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली .


Recent Comments