Belagavi

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली पंचमसाली नेत्यांच्या शिष्टमंडळाशी 2A आरक्षणासंदर्भात चर्चा

Share

मुख्यमंत्र्यांनी सिद्धरामय्या यांनी जगद्गुरू श्री बसव जय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखालील समुदाय नेत्यांच्या शिष्टमंडळाशी पंचमसाली 2A आरक्षणासंदर्भात चर्चा केली.

हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर कायदेतज्ज्ञ आणि कायमस्वरूपी मागासवर्ग आयोग आणि महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, ज्येष्ठ आमदार बी.आर. पाटील, विजयानंद काशप्पनवर, बसवनगौडा पाटील यत्नाळ , विनय कुलकर्णी, सी.सी. पाटील, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी , मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराजू आणि पंचमसाली समाजाचे अनेक नेते शिष्टमंडळात होते.

Tags: