चिक्कोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी आज बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात भव्य मोर्चा काढून जोरदार आंदोलन करून सरकारविरोधात रोष व्यक्त केला.


चिक्कोडी शहरातील बसस्थानकापासून सुरू झालेला हा मोर्चा केसी रोड, कृष्णा सर्कल येथून बसव सर्कलपर्यंत नेण्यात आला . आंदोलकांनी बसव सर्कल येथे तासभर रास्ता रोको करून चिक्कोडी जिल्हा झालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केली .
यावेळी बोलताना संपादन मठाचे स्वामीजी म्हणाले कि , गेल्या 25 वर्षांपासून चिक्कोडी जिल्ह्यासाठी लढा देत आहेत.चिक्कोडी येथे जिल्हास्तरीय कार्यालये आहेत.परंतु अथणी तालुक्यातील जनतेने अथणी स्वतंत्र जिल्ह्यासाठी बंद पुकारला हे योग्य नाही.अथणीने चिक्कोडी जिल्ह्याला सहकार्य करावे असे स्वामीजी म्हणाले त्यानंतर चिक्कोडी जिल्हा संघर्ष समितीच्या जिल्हा सचिव चंद्रकांत हुक्केरी म्हणाले कि , गेल्या 25 वर्षापासून आम्ही चिक्कोडी जिल्ह्यासाठी आंदोलने करत आहोत, मात्र स्थानिक आमदार गणेश हुक्केरी आणि विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी हे जिल्हा निर्माण करणार असल्याचे खोटे बोलून चिक्कोडीच्या जनतेची फसवणूक करत आहेत. अथणी जिल्ह्याचे आमदार लक्ष्मण सवदी यांना यापैकी कोणीतरी पाठिंबा दिला असून हे षडयंत्र असल्याचा संताप व्यक्त केला.
वकील, विद्यार्थी, शिक्षक, तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या लढ्याला पाठिंबा व्यक्त केला. यावेळी जिल्हा संघर्ष समितीचे अध्यक्ष संजू बडिगेर, उपाध्यक्ष संजय पाटील, श्रीकांत आसुदे , सतीश चिंगळे, माजी नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, विश्वनाथ कामगौडा, सचिन दोड्डमणी, श्रीनाथ घट्टी, अमोल नावी, राजेंद्र पाटील, खानप्पा बाडकर , डॉ. जीवन मांजरेकर, विशाल मेत्री तसेच संघर्ष समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.


Recent Comments