राज्य सरकारच्या अपयशाचा निषेध करण्यासाठी बेळगाव येथे 13 डिसेंबर रोजी येडियुरप्पा मार्गावर सरकारच्या विरोधात विशाल महाअधिवेशन घेण्यात येणार असल्याचे विधान परिषद सदस्य एन. रविकुमार यांनी सांगितले.
बेळगावात आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विधान परिषद सदस्य एन. रविकुमार यांनी ही माहिती देऊन सांगितले की, या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, बसवराज बोम्मई, माजी मंत्री बी. श्रीरामुलू मार्गदर्शन करणार असून, 25 हजार भाजप कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
125 वर्षांत एवढा मोठा दुष्काळ पडला नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र आजपर्यंत 125 जणांनाही भरपाई दिलेली नाही. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भरपाई दिलेली नाही. पण अशा स्थितीत अल्पसंख्याकांच्या हितासाठी १० हजार कोटी निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली ही उपरोधिक बाब असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांकडे विजेची कमतरता आहे. त्यांना पुरेशी वीज दिली जात नाही. दुष्काळात सरकारने कूपनलिकांसाठी जाचक अटी घातल्या आहेत. कूपनलिकांसाठी लाखो रुपये शेतकऱ्यांनीच खर्च करणे बंधनकारक केले आहे, असे सांगत त्यांनी खडसावले.
सरकारने उत्तर कर्नाटक सिंचन योजनेसाठी निधी दिला नाही. ते म्हणाले की, आजपर्यंत एक किमीचा रस्ता तयार होऊ शकला नाही. एसटीला हमी योजनांचे 11 हजार कोटी रुपये परत करावे लागणार आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधात बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या अरेरावीविरोधात सभागृहातही आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, काँग्रेस सरकार हमी योजनांच्या नावाखाली जनतेची फसवणूक करत आहे, शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना असलेली किसान सन्मान योजना रद्द करून त्यातील निधीचा गैरवापर केला आहे. एससीएसटी कल्याण निधी या सरकारने लाटला आहे. हमी योजनांच्या नावाखाली अनेक कल्याण योजनांचा निधी काँग्रेस सरकारने लाटला आहे, असा आरोप त्यांनी केला. बाइट
भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनिल बेनके, प्रदेश भाजप प्रवक्ते एम. बी. जिरली, भाजप नेते रवी पाटील पत्रकार परिषदेला उपस्थित होते.


Recent Comments