Belagavi

भाजपने जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करावे : दिनेश गुंडूराव

Share

भाजप देशातील राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त करत आहेत, असे म्हणत मंत्री दिनेश गुंडूराव यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

देशातील कोणत्याही सरकारमध्ये छोट्या-छोट्या समस्या असतात. त्याला अकार्यक्षमता म्हणत नाहीत, सरकारला योग्य मार्गदर्शन करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. ते सर्व सोडून माझ्या मुलांनी मंत्री व्हावे आणि मी मुख्यमंत्री व्हावे, या आशेने सरकार पाडण्याचे काम करणे हे राजकारण मानले जात नाही. पण दुर्दैवाने भाजप तेच करत आहे. जनतेने त्यांना नाकारून घरी पाठवले आहे. त्यांनी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम केले पाहिजे असे ते म्हणाले.

Tags: