Athani

अथणी जिल्हा आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा : ऐच्छिक अथणी बंदला चांगला प्रतिसाद

Share

अथणी जिल्ह्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यात अथणी शहर बंद पुकारण्यात आला होता.अथणी बंदही पूर्णत: यशस्वी झाला.

बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून अथणी जिल्हा करण्यात यावा, या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला होता.सकाळपासूनच व्यावसायिकांनी दुकाने बंद करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला . दूध ,औषधांची दुकाने,हॉस्पिटल वगळता सर्व काही बंद होते.

मात्र केवळ बस वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती.हे पाहून कर्नाटक रक्षण वेदिका , , अथणी जिल्हा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलन करत बस रोखून धरली. अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी सिद्धेश्वर मंदिराजवळून निषेध सभेला सुरुवात केली.

अथणी मोटगी मठ प्रभू चन्नबसव महास्वामीजी म्हणाले की आमच्या लोकांना जिल्हा केंद्रापर्यंत 200 किमीचा प्रवास करून जावे लागते. अथणीलाजिल्ह्याचा दर्जा द्या , अन्यथा तीव्र लढा देऊ असा इशारा स्वामीजींनी राज्य सरकारला दिला. अनेक संघटनांकडून ,आंदोलनस्थळी , तहसीलदारनामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले .

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज अथणीने ऐच्छिक पूर्ण बंद पुकारण्यात आला होता . दुकाने, शाळा, महाविद्यालयांनी या बंदला पूर्ण पाठिंबा दिला असल्याचे गच्चीन मठाचे शिव बसव स्वामीजी यांनी सांगितले. जनतेच्या हितासाठी बेळगाव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि बागलकोट जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ मिळून स्वतंत्र जिल्हा करण्यात यावे, असेही ते म्हणाले. (बाइट)

अथणी जिल्हा करण्यासाठी लढा सुरू असून, अथणी जिल्हा कधी जाहीर होणार, याची प्रतीक्षा करावी लागेल.

Tags: