अँकर पंतप्रधानांचे लोकोपयोगी प्रकल्प गावागावात पोहोचवून जनजागृती करणारी विकसित भारत संकल्प यात्रा अभियान बेळगाव जिल्ह्यात यशस्वीपणे प्रगतीपथावर असून जिल्ह्यातील चिक्कोडी, हुक्केरी, अथणी . सवदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगल बेळगाव, या भागात जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.
व्हॉईस ओव्हर : आज बेळगाव तालुक्यातील हंगलापूर, शिगीहल्ली, नरसापूर, रामदुर्ग तालुका, सुन्हाळा, उमराणी, चिक्कोडी तालुका, जोडकुरळी, यमकनमर्डी, हुक्केरी तालुका, होनगा, बेळगाव तालुका आणि न्यूवंटमुरी या गावांमध्ये केंद्र सरकारच्या योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे मोफत वाटप करण्यात आले.
बैलहोंगल तालुक्यातील शीगीहल्ली गावात झालेल्या संकल्प यात्रेत मोठ्या संख्येने जनता सहभागी झाली होती. खासदार मंगला सुरेश अंगडी, माजी आमदार जगदीश मेटगुड्ड यांच्यासह विविध बँक अधिकारी , महिला सहभागी झाल्या होत्या.
खासदार मंगला अंगडी म्हणाल्या, “”बेळगाव जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वीपणे सुरू आहे. पंतप्रधानांच्या लोकप्रिय योजनांचा लाभ जिल्ह्यातील मोठ्या संख्येने लोकांनी घेतला आहे. उज्ज्वला योजनेमुळे, महिलांना पूर्वी अनुभवत असलेल्या धुराच्या समस्यांपासून सुटका मिळाली आहे. उर्वरित योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. Byte
शिगीहल्ली गावातील लाभार्थी जगदीश हा होसट्टी म्हणाले कि , “पंतप्रधानांनी अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत आणि समाजातील सर्व घटकांना त्याचा फायदा होत आहे.”

सुकन्या समृद्धी योजनेचे लाभार्थी निंगाप्पा जावर म्हणाले की, सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी वरदान आहे.
आणखी एक लाभार्थी, महांतेश इरप्पा आकाडी म्हणाले, “विकासित भारत संकल्प यात्रा मोहिमेद्वारे, पंतप्रधानांचे लोकाभिमुख प्रकल्प गावांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत.”
शिगीहल्ली गावचे आणखी एक लाभार्थी बसवराज मलकन्नवर म्हणाले, “पंतप्रधान किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे”.


Recent Comments