उत्तर कर्नाटकच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा व्हायला हवी. या भागाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सभागृहात चर्चा व्हायला हवी, अशी मागणी काँग्रेस नेते अशोक पुजारी यांनी केली.
बेळगावात आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना अशोक पुजारी यांनी सांगितले की, बेळगावातील सुवर्णसौधमध्ये 4 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. मात्र दुर्दैवाने उत्तर कर्नाटकातील जनतेच्या समस्यांवर अधिवेशनात चर्चा होताना दिसत नाही. ती झाली पाहिजे.
बेळगावात सुवर्णसौध बांधण्याचा उद्देश सीमाप्रश्न सोडवणे हा आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील आमदार आणि मंत्र्यांना मी आवाहन करतो की, बेळगाव ही राज्याची दुसरी राजधानी व्हावी, तसेच विधिमंडळाची अनेक कार्यालये सुवर्णसौधमध्ये येथे स्थलांतरित करावीत, अशी आमची मागणी आहे.
पत्रकार परिषदेला अर्जुन, एम. पी. पाटील, प्रवीण पाटील उपस्थित होते.


Recent Comments