Dharwad

पीडीओच्या आंदोलनाला माजी आ . अमृत देसाई यांचा पाठिंबा

Share

आरटीआय कर्मचाऱ्याच्या छळाला कंटाळलेल्या धारवाड तालुक्यातील येरीकोप्प ग्रामपंचायत पीडीओ नागराज गिनीवाल यांच्यावर अन्याय होऊ नये, या मागणीसाठी पीडीओ धारवाड जिल्हा पंचायत कार्यालयासमोर बेमुदत धरणे सत्याग्रह करत आहेत. सर्व ग्राम पंचायतीनमधील पिडिओना योग्य संरक्षण दिले जावे. या मागणीसाठी सलग चौथ्या दिवशी आंदोलन सुरु आहे .

आज झालेल्या पीडीओच्या आंदोलनाला माजी आमदार अमृत देसाई यांनी पाठिंबा दिला. पीडीओ आल्यानंतर राज्यात बरीच विकासकामे सुरू आहेत. जर एका व्यक्तीने चूक केली तर त्याचा सर्व पिडिओंवर परिणाम होत नाही. कायद्यात काही सुधारणा करायच्या आहेत. हे आंदोलन बेळगाव च्या सुवर्णसौधसमोर केले तर मी तुमच्यासोबत येईन असे ते म्हणाले.

काही आरटीआय कार्यकर्ते वैयक्तिकरित्या पीडीओंना टार्गेट करत आहेत. हे योग्य नाही. कोणत्याही पीडीओने घाईघाईने निर्णय घेऊ नये. तुमच्या मागे एक संघटना आहे. आम्ही पण आहोत.

Tags: