Belagavi

बेळगावात नूतन शिक्षकांना नियुक्ती पत्रकांचे वितरण

Share

तुम्ही शिक्षक झालात ते अत्यंत प्रामाणिकपणे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. अतिशय प्रामाणिकपणे कार्य करून समाज परिवर्तन करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे ती चांगल्या पद्धतीने पार पडण्याचे ध्येय उराशी बाळगून कार्य करावे. असे प्रतिपादन बेंगळुर येथील माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक के. एस. करीचन्नावर यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्त विशेष व्याख्यान आणि नूतन शिक्षकांना नियुक्ती पत्रकांचे वितरण कार्यक्रम बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून “आधुनिक काळात शिक्षण क्षेत्रात शिक्षकाची महत्वाची भूमिका आणि जबाबदारी व कार्य ” या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.

व्यासपीठावरती विषय पर्यवेक्षक एन. आर. पाटील, निलेश शिंदे, सतीश दुरदुंडीमठ, के. एम. मंजुनाथ, आर. एस. वालीशेट्टी, नारायण पाटील, सिद्धाप्पा गावडे, सुनिल पाटील, व्ही. एम. नाईक, नामदेव वड्डेबैलकर, सतीश पाटील, गजानन लोहार, प्रतिभा कम्मार उपस्थित होते.
यावेळी करीचन्नावर यांच्या हस्ते नूतन शिक्षकांना नियुक्ती पत्र वितरण करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या

Tags: