Dharwad

पंचायत विकास अधिकाऱ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच

Share

धारवाड तालुक्यातील यारीकोप गावाच्या पीडीओ आत्महत्येचा प्रयत्न प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि पंचायत विकास अधिकारी कल्याण संघाच्या सदस्यांनी धारवाड जिल्हा पंचायत कार्यालयासमोर पुकारलेले आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरु होते .

पीडीओ नागराज गिनीवाला यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाला जबाबदार असलेले आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन रोट्टीगवाड यांना अटक करण्याची आणि सरकारी अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली.

पंचायत विकास अधिकारी कल्याणकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू वारणा यांनी, बेमुदत आंदोलन केले जात असल्याचे सांगितले .
या आंदोलनात दावणगेरे, बेळगाव, गदग, हावेरीसह विविध जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी व पंचायत विकास अधिकारी सहभागी झाले होते.

Tags: