Belagavi

शेतकऱ्यांना अधिक भरपाई देण्याची मुख्यमंत्र्यांना करणार विनंती : विनय कुलकर्णी

Share

राज्यात भीषण दुष्काळ असताना सरकारने शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची मदत दिली आहे. याहून अधिक भरपाई देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे आमदार विनय कुलकर्णी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेली दोन हजार रुपये भरपाई कुठेच पुरत नाही. त्यामुळे शेतकरी समाधानी नाही. उत्तर कर्नाटकात थोडा पाऊस झाला तरी शेतकऱ्यांनी पिके घेतली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्या शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे आ. विनय कुलकर्णी यांनी सांगितले

पंचमसाली संघर्षाबाबत आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून त्यांच्याशी स्वामीजींची भेट घडवून देणार आहे असे विनय कुलकर्णी यांनी या बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले

Tags: