Belagavi

बेळगावात शेतकऱ्यांचा चन्नम्मा सर्कलपासून सुवर्णसौधपर्यत पायी मोर्चा

Share

बेळगावात चन्नम्मा चौकात शेतकऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह निदर्शने करत सरकारविरोधात रोष व्यक्त केला. स्वामिनाथनच्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी, उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत तसेच , महादयी संघर्ष, दुष्काळमुक्तीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले .

शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली , शहरातील चन्नमा सर्कल येथे मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकर्यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करून , निदर्शने केली . यावेळी चन्नमा सर्कलमध्ये ठिय्या आंदोलन करून , न्याय देण्याची मागणी केली .

यावेळी बोलताना चुनाप्पा पुजारी म्हणले कि , आज मेळकोटचे आमदार दर्शन पुट्टय्या यांनी शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.दुष्काळग्रस्त भागाला अद्यापही मदत देण्यात आलेली नाही.त्यांनी सुवर्ण सौधाजवळ आंदोलनासाठी मंडप दिला आहे.

चन्नम्मा सर्कल ते सुवर्णसौध पर्यंत आम्ही पायी आंदोलन करणार आहेत. पानगी देणार नसल्याचे पोलिसांनी आधीच सांगितले आहे. मात्र, कोणी काहीही बोलले तरी आम्ही आंदोलन करणारच असे ते म्हणले .  यानंतर सर्व आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी , सुवर्णसौधकडे पायी मोर्चा काढला . या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते .

Tags: