Belagavi

भीमा गोल्डच्या लकी ड्रॉमध्ये शेतकऱ्याने जिंकली कार!

Share

राज्यातील प्रसिद्ध ज्वेलरी स्टोअर भीमा गोल्डच्या दिवाळी स्पेशल लकी ​​ड्रॉमध्ये बिदर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कार जिंकली आहे.

राज्यातील प्रसिद्ध दागिन्यांच्या साखळी दुकानांची फर्म ‘भीमा गोल्ड’ आपल्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शुद्ध सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासह शुद्ध सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने देण्यासाठी ही फर्म सुपरिचित असून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ग्राहकांना, विविध स्कीम्स, ऑफर्स भीमा गोल्डकडून दिल्या जातात. त्याचप्रमाणे यंदाच्या दिवाळीत भीमा गोल्डने आपल्या ग्राहकांसाठी खास लकी ​​ड्रॉ ऑफर ठेवली होती. या ​​ड्रॉमध्ये बीदरच्या कमलनगर येथील एका शेतकऱ्याचे नशीब फळफळलें आहे. बीदरचे शेतकरी मारुती गुंडूराव शेरे यांनी बेळगाव येथील भीमा गोल्ड स्टोअरमध्ये 30 ग्रॅम सोन्याची चेन खरेदी केली होती. बीदरच्या शेतकरी मारुती शेरे यांनी लकी ड्रॉमध्ये कार जिंकली. त्यांना खास बीदरहून बोलावून घेऊन भीमा गोल्डकडून कार सुपूर्द करण्यात आली.

यावेळी बोलताना भीमा गोल्डचे डेप्युटी मॅनेजर विकास नलवडे यांनी सांगितले की, दरवर्षी दिवाळीला लकी ड्रॉ योजना राबवितो. यंदाच्या लकी ड्रॉमध्ये बिदर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कार जिंकली आहे. त्यांना आम्ही कार प्रदान करत आहोत. भीमा गोल्डच्या वतीने प्रत्येक सण-उत्सवासाठी विशेष ऑफर्स, स्कीम्स देण्यात येत आहेत. सगळ्यांनी एकदा आमच्या भीमा गोल्ड शोरूमला अवश्य भेट देऊन विशेष ऑफर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार जिंकल्याने शेतकरी मारुती शेरे व त्यांच्या कुटुंबियांना अतीव आनंद झाला होता. यावेळी मारुती शेरे यांनी सांगितले की, आपण काही कामासाठी बेळगावला आलो होतो, दिवाळी सण असल्याने चेन खरेदी करावी असे वाटल्याने मी चेन विकत घेतली आणि लकी ड्रॉ जिंकला. त्याचा खूप आनंद झाला.

खरोखरच, भीमा गोल्ड ज्वेलरी शोरुमकडून ग्राहकांना तत्पर सेवा, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण दागिने देऊन ग्राहकांचे हित जपले जाते. सर्वानी एकदा या शोरूमला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटला पाहिजे. यावेळी कार जिंकलेले शेतकरी मारुती शेरे व त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. याप्रसंगी भीमा गोल्डचे असोसिएट मॅनेजर आशिष, कार विजेते मारुती शेरे व त्यांचे कुटुंबीय व भीमा गोल्डचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: