Belagavi

भाजपने गोळीहट्टी शेखर यांचा जातीवरून अवमान केला : प्रियांक खर्गे

Share

भाजपने स्वतःच्याच माजी मंत्र्यांचा केवळ दलित असल्याने अवमान केले असा आरोप करत मंत्री प्रियांक खर्गे यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला.

बेळगावात बुधवारी सुवर्णसौधा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री प्रियांक खर्गे म्हणाले की, भाजपचे माजी मंत्री गोळीहट्टी शेखर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीत वाढलेले भाजप कार्यकर्ता, आरएसएस नेते हेडगेवार यांच्या घरी गेले असता हिंदुत्ववाद्यांनी जात कोणती विचारून मला आत जाऊ देण्यास नकार दिला. अशी वागणूक केवळ मलाच दिली की कारजोळ, केंद्रीय मंत्री नारायण स्वामी यांनाही दिली असा प्रश्न गोळीहट्टी शेखर यांनी विचारला होता, यावर बी. एल. संतोष यांनी उत्तर द्यावे असे प्रियांक खर्गे सांगितले.

भाजप आमदार यत्नाळ यांनी खर्गे पिता-पुत्रावर केलेल्या आरोपासंदर्भातील प्रश्नावर, प्रियांक यांनी, यत्नाळ जातील तेथे घंटी वाजवतात, भाजपमध्येच त्यांना किंमत नाही, मग मी का उत्तर द्यावे असे सांगितले.

Tags: