Belagavi

१३ डिसेंबरला प्रभावती फौंडेशन, सौहार्दचे उदघाटन

Share

काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी स्थापन केलेल्या प्रभावती फौंडेशन आणि प्रभावती सौहार्द सहकारी संस्थेचा उदघाटन सोहळा येत्या बुधवार दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सोनार गल्ली, वडगाव येथे आयोजित केला आहे.

बेळगाव दक्षिण मतदार संघातील नागरिक विशेषतः महिला आणि युवा वर्गाच्या आर्थिक, सामाजिक अपेक्षा पूर्ण करून त्यांचा विकास साधण्यासाठी काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी प्रभावती फौंडेशन आणि प्रभावती सौहार्द सहकारी संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेचा उदघाटन सोहळा येत्या बुधवार दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सोनार गल्ली, वडगाव येथे आयोजित केला आहे.

याबाबत ‘इन न्यूज’ला अधिक माहिती देताना काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी सांगितले की, बेळगाव दक्षिण मतदार संघातील सर्व समाजाच्या लोकांच्या प्रगतीचा उद्देश ठेवून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावती फौंडेशन आणि प्रभावती सौहार्द सहकारी संस्थेची स्थापना केली आहे. विशेषतः महिला आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांची प्रगती करण्याचा हेतू यामागे आहे. त्यादृष्टीने १८ ते ५८ वयोगटातील महिलांना एक लाख रुपयांचा विमा संस्थेतर्फे पहिला हप्ता भरून काढून देण्यात येईल. त्याचा संबंधितांनी सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या काही वर्षात दक्षिण मतदार संघाचा विकास ठप्प झाला आहे. केवळ काही अशी मोजकी विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे फौंडेशनतर्फे विकासकामांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. या मतदार संघातील विणकरांना अनेक समस्याना सामोरे जावं लागत असल्याने सरकारपुढे त्यांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यांची दखल घेऊन सरकारने विणकरांना १० एचपी पर्यंतचे वीजबिल माफ केले आहे. मुख्यमंत्री सिद्दरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार, बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी विणकरांच्या समस्या सहानुभूतीने ऐकून सोडविल्या आहेत. त्याशिवाय गृह्ज्योती, गृहलक्ष्मी आदी योजना सरकारने अमलात आणल्या आहेत. त्याबद्दल काँग्रेस सरकारचे मी आभार मानते असे त्यांनी सांगितले.

येत्या बुधवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सोनार गल्ली, वडगाव येथे प्रभावती फौंडेशन आणि प्रभावती सौहार्द सहकारी संस्थेचे उदघाटन मान्यवर मंत्री व आमदारांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांनी आम्हाला पूर्वीप्रमाणेच सहकार्य करावे असे आवाहन प्रभावती मास्तमर्डी यांनी केले.

Tags: