करगाव उपसा जलसिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्याची आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी विधानसभेत मागणी केली .
बेळगाव अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात , आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी रायबाग विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या करगाव उपसा जलसिंचन प्रकल्पाचे काम सुरू करण्याची मागणी केली . चिक्कोडी तालुक्यातील 14 गावांतील 8 हजार 390 हेक्टर जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजप सरकारच्या काळात 100 कोटींचे अनुदान जाहीर केले. 14.03.2023 रोजी , 567 कोटी रुपये खर्चाच्या करगाव उपसा सिंचन प्रकल्पाचे काम , काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर बंद करण्यात आले असून त्यांनी हे काम पुन्हा सुरू करण्याची विनंती केली .
पाटबंधारे मंत्री दि के शिवकुमार अधिवेशनाला अनुपस्थित असल्याने मंत्री रामलिंगारेड्डी यांनी उत्तर दिले कि , करगाव उपसा जलसिंचन प्रकल्प हा एक चांगला प्रकल्प आहे आणि याबद्दल पाटबंधारे मंत्र्यांना कळवू.
करगाव प्रकल्पासाठी 30 वर्षे लढा देत आहोत . यासाठी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत आमदार दुर्योधन अहोळे यांनी काम सुरू करण्याचा आग्रह धरला मंत्री रामलिंगरेड्डी म्हणाले की करगाव प्रकल्प हा एक आवश्यक प्रकल्प आहे आणि ते डीके शिवकुमार यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवतील.


Recent Comments