Belagavi

प्रथमोपचार तज्ञांच्या संघटनेतर्फे सुवर्णसौध आंदोलनस्थळी धरणे

Share

बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कर्नाटक राज्य वैद्यकीय प्रथमोपचार तज्ञ संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

आपल्या विविध या मागण्यांसाठी कर्नाटक राज्य वैद्यकीय प्राथमिक उपचार विशेषज्ञ संघटनेच्या वतीने सुवर्णसौध परिसरातील निदर्शनस्थळी आंदोलन करण्यात आले.

यावेळी कर्नाटक राज्य वैद्यकीय प्राथमिक उपचार विशेषज्ञ संघटनेचे राज्य अध्यक्ष पीके कुमार म्हणाले की, कर्नाटक राज्यात 30-40 वर्षापासून आम्ही राज्यातील बहुतांश गावांमध्ये आणि शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये प्रथमोपचार करत आहोत आणि आजपर्यंत आम्ही प्राथमिक उपचार करत आमच्या जीवनाचा गाडा वाहत आहोत.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी अनेक अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे अनेक वर्षांपासून कोणतेही प्रमाणपत्र नसल्याच्या नोटिसा दिल्या आहेत. अनेक प्रेस आणि टीव्ही मिडीयाच्या लोकांमुळे आम्ही त्रस्त आहेत. आमचे जगणे कठीण बनले आहे. त्यासाठी आम्ही सुमारे दहा वर्षे या संघटनेच्या अंतर्गत लढा आणि सत्याग्रह करत आहोत. मध्यंतरी काँग्रेस सरकारचे कर्नाटकाचे आरोग्य मंत्री असलेले यू. टी. खादर यांनी आमचा संघर्ष पाहून राज्यातील आमच्या सर्व सदस्यांची यादी तयार करून देण्याची सूचना केली. त्यानुसार आम्ही आमच्या सर्व सभासदांची यादी 09.02.2015 रोजी त्यांच्या आदेशानुसार फ्रीडम पार्कच्या आवारात शासनाला दिली. मात्र आजतागायत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आम्ही नाराज आहोत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कर्नाटक राज्य वैद्यकीय प्राथमिक उपचार विशेषज्ञ संघटनेचे अनेक सदस्य उपस्थित होते.

Tags: