मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व समाजाला समान वागणूक दिली पाहिजे, असे सांगत माजी मंत्री अश्वत्थ नारायण यांनी सिद्दरामय्या यांच्यावर टीका केली.
बेळगावमध्ये मंगळवारी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री अश्वत्थ नारायण म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व समाजाला समान वागणूक दिली पाहिजे, काँग्रेस पक्ष मुस्लिम समाजाला समृद्ध करण्यासाठी राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, सरकार मुस्लिम समाजावर 10 हजार कोटी रुपये खर्च करत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे त्यांना शक्य होत नाहीय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे शक्य होत नाही.
आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्याकडे आमदारांची तक्रार असेल तर आमदार चुकीचे आहेत, भाजपमध्ये नाराजी नाही, आम्ही सर्व एकच आहोत, असे माजी मंत्री अश्वत्थ नारायण यांनी म्हटले.


Recent Comments