बैलहोंगल शहरात दरवर्षीप्रमाणे, उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या जत्रांपैकी एक असलेली श्री मरडी बसवेश्वर जत्रा मोठया उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली . शहरातील प्रसिद्ध श्री मरडी बसवेश्वर मंदिराचा महारथोत्सव सोमवारी संध्याकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .

मुरुसावीर मठाचे प्रभू नीलकांत स्वामीजी आणि बैलहोंगल शहराचे आमदार महांतेश कौजलगी आणि शहरातील जेष्ठांच्या उपस्थितीत जवळी खुट येथून प्रारंभ शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी म्हणाले की, बैलहोंगल शहरात दरवर्षीप्रमाणे श्री मरडी बसवेश्वर जत्रा साजरी केली जात आहे . उत्तर कर्नाटकातील ही सर्वात मोठी जत्रा आहे.प्रसिद्ध श्री मरडी बसवेश्वर मंदिराचा महारथोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. 50 हजाराहून अधिक भाविक यात सहभागी झाले होते .
मुरुसावीर मठाचे प्रभू नीलकांत स्वामीजी यांनी यावेळी भक्तांना शुभेच्छा दिल्या आणि श्री मरडी बसवेश्वर जत्रेत सहभागी झालेल्या भक्तांना कोणताही गोंधळ न घालता , शांततेत रथोत्सव साजरा करण्यास सांगितले.


Recent Comments