कर्नाटक राज्य ग्राहक वाद निवारण आयोग कायमस्वरूपी फिरते खंडपीठ आणि कायमस्वरूपी अतिरिक्त ग्राहक आयोगासाठी बेळगावात तातडीने इमारत उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी अहिंद वकील संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले.
बेळगाव येथे कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कायमस्वरूपी फिरते खंडपीठ स्थापन करण्याची शिफारस यापूर्वीच करण्यात आली आहे. त्यासाठी तातडीने इमारतीची निवड करावी, तसेच बेळगाव येथे कार्यरत अतिरिक्त ग्राहक आयोगासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करावी. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे समस्या निर्माण होणार आहेत. त्या होऊ नयेत यासाठी आताच उपाययोजना करावी अशी मागणी अहिंद वकील संघाचे पदाधिकारी वकील एन. आर. लातूर यांनी केली.
कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या कायमस्वरूपी फिरत्या खंडपीठासाठी तातडीने इमारतीची निवड करण्यात यावी आणि अतिरिक्त ग्राहक आयोग कायमस्वरूपी करण्यात यावा आणि स्वतंत्र न्यायालय कक्ष, कर्मचारी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. फ्लो
वकील निंगाप्पा मस्ती, चेतन हेडगे, विनोद एस. पाटील, के.के. यादगुडे, एस. बी. पवडेपनावर, व्ही. एस. पाटील यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.


Recent Comments