धारवाडजवळील मंडीहाळ गावाच्या क्रॉसजवळ रस्त्याच्या मधोमध कंटेनर लॉरीने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुदैवानेच या घटनेत जीवितहानी झाली नाही.
धारवाड-गोवा रस्त्यावरील मंडीहाळ क्रॉसजवळ रस्त्याच्या मधोमध धावत्या कंटेनरने पेट घेतला. या आगीत लॉरी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही कंटेनर लॉरी गोव्याहून धारवाडकडे येत असल्याची माहिती मिळाली आहे. धारवाड तालुक्यातील मंडीहाळ गावाजवळ लॉरीला आग लागली. लागलीच लॉरी चालकाने आपले वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले आणि बाहेर आला. रस्त्यावर लॉरी जळताना पाहून स्थानिक वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. चालकाने माहिती दिल्यावरून अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली. ही घटना धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.


Recent Comments