Dharwad

धारवाडमध्ये खासगी बसला लॉरीची धडक

Share

खासगी बसला मागून आलेल्या लॉरीने धडक दिल्याने बसमधील दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना धारवाड एसडीएम रुग्णालयाजवळ घडली.

हुबळी-धारवाड मुख्य रस्त्यावरील एसडीएम हॉस्पिटलजवळ लॉरीने खासगी बसला मागून जोराची धडक दिली. या अपघातात एक पुरुष आणि एक महिला प्रवासी जखमी झाले. स्थानिकांच्या माहितीवरून धारवाड वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. खासगी वाहतुकीची बस रुग्णालयाजवळील सिग्नलच्या खांबाला धडकल्याने लॉरीची धडक बसून बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले.

Tags: