चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरातील स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरातील स्मशानभूमीत लोक अंत्यसंस्कारासाठी येऊ नयेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्मशानभूमीतील काटेरी झाडे, झुडुपे, कचरा यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. स्थानिकही स्वत:हून स्मशानभूमी स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. असा पुढाकार एकविरी फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार डांगे यांनी घेतला आहे.
नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीच्या जागेवर लक्ष केंद्रित करून विकास करावा व स्मशानभूमीत शेड, पाण्याची टाकी आदींसह अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी एकविरी फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार डांगे यांनी केली. बाइट स्मशानभूमीच्या विकास कामाला फारसे प्राधान्य दिले जात नसल्याचे दिसून येत आहे.
तलाव, पाणी, विविध प्रकारच्या इमारतींच्या कामांनाच अधिकारी प्राधान्य देत असून स्मशानभूमीच्या विकासाचा त्यांना विसर पडला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कैलास माळगे यांनी केला.
एकंदरीत सदलगा स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असून, त्यासाठी पालिका अधिकारी काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.


Recent Comments