Belagavi

सिल्क्यारा मोहिमेत सहभागी बेळगावच्या तज्ज्ञांचा गौरव

Share

उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना वाचवण्यात सहभागी झालेले बेळगावचे तज्ज्ञ दौदीप खानारा आणि भालचंद्र किलारी यांचा बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

उत्तराखंड बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यात बेळगावच्या एल अँड टी पाणीपुरवठा प्रकल्पाच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी दौदीप खानरा आणि . भालचंद्र किलारी यांना रोबोटिक कॅमेरा उपकरणे हाताळणारे तज्ञ म्हणून नेमण्यात आले होते. बचाव कार्याचे सतत फुटेज मिळवण्यात आणि अडकलेल्या कामगारांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात त्यांनी मोठे योगदान दिले.

या आव्हानात्मक मोहिमेत केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन दौदीप खानारा आणि भालचंद्र किलारी यांचा बेळगाव महानगरपालिका आणि उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार राजू सेठ म्हणाले की, उत्तराखंड बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यात आमच्या भागातील तरुणांनी सहभाग घेतला. दौदीप खानरा आणि भालचंद्र किलारी यांना रोबोटिक कॅमेरा उपकरणे हाताळणारे तज्ञ म्हणून नेमण्यात आले होते. त्यांनी बचाव कार्याचे सतत फुटेज मिळवत आणि अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या कामगिरीमुळे बेळगाव शहराचे नाव उंचावले आहे, असे आ. राजू सेठ म्हणाले.

यावेळी महानगरपालिकेचे व एल अँड टी कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: