Banglore

शाळांना बॉम्बची धमकी : काळजी करण्याचे कारण नसल्याचे डीकेशींचे स्पष्टीकरण

Share

राजधानी बेंगळूरमधील 15 हून अधिक शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. बसवेश्वर नगर आणि येलहंका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.

सिलिकॉन सिटीमधील 15 हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत, त्यामुळे पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते पूर्ण सतर्क झाले आहेत. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्वतःहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

प्रसारमाध्यमांना बॉम्बच्या धमकीसंदर्भात प्रतिक्रिया देताना डिकेशी धमक्या आल्या असल्या तरी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. पोलीस तपास करत आहेत. मी स्वतः शहर पोलीस आयुक्तांशीही बोललो आहे. कोणीही काळजी करू नये, ज्या शाळांमध्ये धमकीचे ई-मेल आले आहेत त्या शाळा पोलीस तपासत असून, घाबरण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Tags: