Belagavi

महामेळावा यशस्वी करण्याचा मए युवा समितीचा ठराव

Share

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय येथे युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या विरुद्ध महामेळाव्याचे आयोजन सोमवार 4 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. हा महामेळावा यशस्वी करण्याचा ठराव संमत करण्यात आला. या महामेळाव्याला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आपली ताकत दाखवावी असे आवाहन करण्यात आले.
कन्नड संघटनांनी बेळगावमध्ये जो धुडगूस घातला आहे आणि मराठी व इंग्रजी फलकांना लक्ष्य करण्यात येत आहे, आणि त्याचवेळी पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत त्याचा या बैठकीत निषेध करण्यात आला. भाषिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीत बेळगाव तालुका प्रमुख मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी विचार मांडले.
बैठकीला उपाध्यक्ष राजू कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, महेश जाधव, आकाश भेकणे, आनंद पाटील, विशाल अणवेकर आदी उपस्थित होते. चिटणीस प्रतीक पाटील यानी आभार मानले.

Tags: