बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील एकही गाव विकासापासून वंचित राहू नये, या उद्देशाने काम सुरू असल्याचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले.
शुक्रवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेनकनहळ्ळी गावात श्री महालक्ष्मी देवी जत्रा महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या सभेत सहभागी होऊन देवीची पूजा केल्यावर ते बोलत होते. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर दूरदृष्टीने काम करत आहेत. आमदार होण्यापूर्वीच त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहिले. तसेच त्यांनी यापूर्वीही सरकारवर दबाव आणून अनेक प्रकल्प आणले होते.
आमदार झाल्यापासून 1800 कोटी रुपयांहून अधिकची विकासकामे बेळगाव ग्रामीण मतदारसंघात झाली आहेत. आता त्या या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मंत्री म्हणून काम करत आहेत. संपूर्ण राज्याची जबाबदारी असली तरी ते या क्षेत्राकडे दुर्लक्ष व करता प्राधान्याने काम करत आहेत. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती चन्नराज हट्टीहोळी यांनी केली.
कार्यक्रमात युवराज कदम, मोनाप्पा पाटील, ज्योतिबा देसुरकर, बाळू देसुरकर, यल्लाप्पा पाटील, कल्लाप्पा देसुरकर, आनंद पाटील, मीनाक्षी पाटील, शिल्पा मुंगळेकर, कलावती देसुरकर, महेश पाटील, लक्ष्मण खांडेकर, राहुल देसुरकर, महेश कोलकार आदी उपस्थित होते.


Recent Comments