Belagavi

उत्तर कर्नाटकातील समस्या सोडविण्यासाठी 5 डिसेंबरला धरणे : गडाद

Share

येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री असताना बेळगावातील सुवर्णसौध येथे राज्यस्तरीय कार्यालये स्थलांतरित करणार असल्याचे सांगितले होते. परंतु जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाचे स्थलांतर करून बेळगावातील जनतेला त्रास दिल्याची नाराजी माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी व्यक्त केली.

बेळगावात आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना भीमाप्पा गडाद म्हणाले की, आमचा मूळ संघर्ष वेगळ्या उत्तर कर्नाटक राज्याचा आहे, उत्तर कर्नाटकाबाबत सरकारकडून सतत सापत्नभावाची वागणूक देण्यात येत आहे. बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बेळगावला दुसरी राजधानी म्हणून घोषित करावे, तसेच उत्तर कर्नाटकातील विविध समस्यांचे निराकरण करावे या मागण्यांसाठी विविध स्वामीजी, मठाधीशांच्या नेतृत्वाखाली येत्या 5 डिसेंबरला धरणे सत्याग्रह करण्यात येणार आहे.

यापूर्वीच्या भाजप सरकारमध्ये येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना त्यांनी बेळगाव सुवर्णसौध येथे राज्यस्तरीय शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्याऐवजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये स्थलांतरित करून बेळगावातील जनतेला त्रास दिला असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेला उत्तर कर्नाटक संघर्ष समितीचे राज्य सरचिटणीस नागेश बोळशेट्टी, पदाधिकारी माणिक्य चेल्लुर, प्रकाश देसाई, श्रीनिवासगौडा पाटील, विलीनकुमार तारिहाळ आदी उपस्थित होते.

Tags: