आरटीआय कार्यकर्त्याच्या छळाला कंटाळून एका पीडीओने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना धारवाडमध्ये घडली आहे.
यरीकोप्प ग्रामपंचायत पीडीओ नागराज यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याआधी त्यांनी व्हिडीओ बनवून आत्महत्येचे कारण सांगितले आहे. आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन रोट्टीगवाड यांनी केलेल्या छळामुळे आपण उंदीर मारायचे विष प्राशन करून आत्महत्या करत आहोत असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
रोट्टीगवाड यांनी माझ्यासह अनेक सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास दिला आहे. ते तुम्हाला अशा गोष्टी करायला भाग पाडतात ज्या तुम्ही करू नयेत. त्यासाठी मी येथेच जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. विष पितो असे सांगून अनेक मित्रांना व्हॉट्सअप करत नागराज यांनी व्हिडीओ बनवून आत्महत्येचा प्रयत्न केला.
लगेच त्याच्या मित्रांनी त्याला शोधून वाचवण्याचा प्रयत्न केला. नागराज यांनी धारवाड-बेळगाव रस्त्यावर विष पिल्याचे आढळून आल्याने त्याना तत्काळ रूग्णालयात नेण्यात आले. या घटनेने धारवाड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.


Recent Comments