Belagavi

मन्नूर येथे 180 कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर वितरण

Share

बेळगाव तालुक्यातील मन्नूर येथे केंद्र सरकारच्या उज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस सिलेंडर शेगडी पाईप रेगुलेटर आदी साहित्याचे भाजप नेत्यांच्याहस्ते वितरण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील गरीब महिलांचे अश्रू पुसण्यासाठी उज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस सिलेंडर, शेगडी, पाईप, रेग्यूलेटर आदी संपूर्ण साहित्य दिले जाते आहे. बेळगाव तालुक्यातील मन्नूर येथे बेळगावच्या खासदार श्रीमती मंगल अंगडी व राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, माजी मंडळ अध्यक्ष विनय कदम, रवींद्र चौगुले, विश्वनाथ चौगुले, बाळू पाटील, अनिल पाटील, आदींच्या उपस्थितीत 180 कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर वितरण करण्यात आले. याप्रसंगी मन्नुर पंच क्रोशीतील सुळगा, कल्लेहोळ, आंबेवाडी अतिवाड, बेक्किनकेरे, बेनकनहळ्ळी व इतर गावातील शेकडो लाभार्थी उपस्थित होते.

Tags: