महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तेलंगणातील महेश्वरम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा जोरदार प्रचार केला.
कर्नाटकच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महेश्वरम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लक्ष्मा रेड्डी यांचा प्रचार केला. हेब्बाळकर यांनी काँग्रेस पक्षाच्या कामगिरीची माहिती जनतेला देऊन काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे सांगितले. यावेळी तामिळनाडूचे खासदार विष्णुप्रसाद, उमेदवार लक्ष्मा रेड्डी, एआयसीसीच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments