स्वच्छ समाज निरोगी, परिपूर्ण जीवन जगतो. आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने परिश्रम घेतले पाहिजे असे सुरेश यादव फौंडेशनचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी सांगितले.
बेळगावातील रामतीर्थ नगर येथील सुरेश यादव फौंडेशन आणि रामतीर्थ नगर रहिवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कणबर्गी तलावाच्या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. सुशिक्षित व जागरूक नागरिकांनी या स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. आपला परिसर सुंदर व स्वच्छ ठेवण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. ती एक सामाजिक चळवळ असावी, असे ते म्हणाले
भारतात स्वच्छता अभियानाद्वारे स्वातंत्र्याची इच्छा निर्माण करणे हे महात्मा गांधींचे स्वप्न होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही न्यू इंडियाचे स्वप्न साकार होण्यासाठी स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक चिंतेमुळे सुरेश यादव यांनी स्वत:ची टीम तयार केली असून दर रविवारी त्यांच्या आजूबाजूचा तलाव, शाळेचे मैदान, बसस्थानक आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू ठेवली आहे.

सुरेश यादव यांच्या या कार्याबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. बाईट
स्वच्छता अभियानात गुरूपुत्रप्पा तोरगल, अप्पय्या कोलकार, सिद्धराय सिगीहळ्ळी, शंकर जिनराळे, संतोष मेरेकर, राजशेखर शिंदे, मल्लारी दीक्षित, शिवलिंग कबडगी, अमर, नीतीन पाटील, स्नेहल बेली, डॉ. राहुल कुमतकर, अभिषेक अगसगी, लंगोटी सर आदींनी सहभाग घेऊन श्रमदान केले.


Recent Comments