शरण परंपरेचे पालन करणार्यांसाठी खरा कोणता उत्सव असेल तर तो म्हणजे लिंगपूजा, जंगम दासोह, बसवादी शिवशरणांनीच समाजातील दुर्बलांना ‘जेवू घालून जेवा’ संस्कृतीची ओळख करून दिली.

नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. शिवबसव महास्वामीजीनी ही संस्कृती प्रत्यक्षात आणली. त्यांचा महान वारसा समाजाने पुढे चालू ठेवला पाहिजे असे मत मुदुगल महांतेश्वर मठ कल्याण आश्रमाचे प्रख्यात योगी महंत स्वामीजी यांनी व्यक्त केले. बेळगावातील नागनूर रुद्राक्षी मठातील प्रभूदेव सभागृहात कायकयोगी महाप्रसादी डॉ शिव बसव महास्वामी यांच्या १३४ व्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित ‘शरण अनुभवामृत प्रवचन’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
नागनूर रुद्राक्षी मठ डॉ. अल्लमप्रभू महास्वामी म्हणाले की, आजच्या तरुणांनी बसवदी शिवशरणाने दिलेली कायक आणि दासोहाची महान तत्त्वे अंगीकारली पाहिजेत. समाजात जनजागृती करण्यासाठी आतापासून 4 डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी 6 वाजता ‘शरणांचे अमृतानुभव’ प्रवचन होणार असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे ते म्हणाले.
कित्तूर राजगुरू संस्थान कलमठचे मडीवाळ राजयोगिंद्र महास्वामी म्हणाले की, शिवबसव स्वामीजींचे जीवन आदर्श होते. पीडितांच्या वेदना दूर करून, त्यांना अन्न-छत्र देऊन त्यांनी समाजाचे नेतृत्व केले. आपण सर्वांनी त्याच्या मार्गावर चालूया असे ते म्हणाले. व्यासपीठावर निच्चनकी मडिवाळेश्वर मठाचे पंचाक्षरी महास्वामी, ओम गुरुजी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. ए.एल. पाटील यांनी स्वागत तर राजशेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्याते मंजुनाथ शरणप्पा यांनी आभार मानले.
दरम्यान, शिवबसव स्वामींच्या जयंतीनिमित्त बेळगावात त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढलेल्या या मिरवणुकीत विध्यार्थी-विद्यार्थिनी डोक्यावर वचन पुस्तक घेऊन सहभागी झाले होते.


Recent Comments