Belagavi

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. विजयालक्ष्मीदेवी

Share

भारताची राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे, परिवर्तनवादी संविधान आहे, असे प्रतिपादन बेळगावच्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. विजयालक्ष्मीदेवी यांनी केले.

बेळगाव येथील केएलएस राजा लखम गौडा विधी महाविद्यालयात सोमवारी ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून बेळगावच्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. विजयालक्ष्मीदेवी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी संविधान दिन सोहळ्याचे महत्त्व सांगितले. २६ नोव्हेंबर हा भारतामध्ये संविधान दिन म्हणून ओळखला जातो. भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आले होते. या संविधानातून आपल्या देशाची विविधता दिसून येते, हे जगातील सर्वात मोठे आणि परिवर्तनवादी संविधान आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एम. आर. कुलकर्णी म्हणाले की, मानवी जीवन जगण्यासाठी अधिकार आणि स्वातंत्र्य या मूलभूत गरजा आहेत, ज्या आपल्या संविधानातून मिळतात. याचे संपूर्ण श्रेय संविधानाच्या दृष्ट्या कर्त्यांना जाते, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटक लॉ सोसायटीचे सचिव ऍड. विवेक कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार, प्रा. चेतनकुमार, आयक्यूएसी समन्वयक डॉ. समिना नाहिद बेग, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: