Belagavi

बेळगावात रविवारी राज्यघटना दिन

Share

बेळगावात येत्या रविवार दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विविध दलीत संघटनेच्या नेत्यांनी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी उपस्थित राहावे असे आवाहन यासंदर्भात झालेल्या बैठकीत करण्यात आले.

या कार्यक्रमा नंतर येत्या 05/12/2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता कँडल मार्च तसेच 6/12/2023 रोजी सकाळी 8 वाजता होणाऱ्या डॉ बाबासाहेब साहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजन संदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे. तरी सर्वांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन दलित नेते मल्लेश चौगुले,

बसवराज रायगोळ, सिद्धप्पा कांबळे यांनी केले आहे. बैठकीला जीवन कुरणे, महादेव तळवार, आनंद कोलकार, रामा चव्हाण, अनिल कांबळे, दीपक धबाडे, सागर कोलकार, कल्लप्पा रामच्चनावर, सिद्दराय मेत्री, शंकर कांबळे, रवी बस्तवाडकर उपस्थित होते.

Tags: