चिक्कोडी तालुक्यातील पट्टणकुडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेतून नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात मुलाच्या वडिलांनी खडकलाट पोलिसात अपहरणाची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

अपहरण झालेला मुलगा रामदुर्ग तालुक्यातील असून तो मोरारजी देसाई निवासी शाळेत इयत्ता सातवीपासून शिकत आहे. 20 नोव्हेंबर रोजी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम आटोपल्यानंतर वसतिगृहाच्या खोलीत विश्रांतीसाठी जात असल्याचे सांगून तो शाळेतून वसतिगृहात गेला. मात्र रात्री मुलगा खोलीत नसल्याचे आढळून आले. त्यानुसार मुलाच्या वडिलांनी पोलिसांत अपहरणाची फिर्याद दिली आहे.


Recent Comments