मागील भाजप सरकारने डीके शिवकुमार यांच्याविरुद्ध सूडाचे राजकारण केले आणि त्यांच्याविरुद्ध सीबीआय तपासाला परवानगी दिली, असा आरोप महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलाय.
उडुपीच्या मणिपाल राजताद्री येथील जिल्हा पंचायत डॉ. व्हीएस आचार्य सभागृहात आयोजित कर्नाटक विकास कार्यक्रमांच्या त्रैमासिक प्रगती आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तत्कालीन सभापतींची संमती न घेता आणि ऍडव्होकेट जनरलकडून माहिती न घेता डीके शिवकुमार यांच्या विरोधात तोंडी आदेश जारी केला होता.
तत्कालीन भाजप सरकारने उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याविरोधात सूडाचे राजकारण केले आणि त्यांच्याविरुद्ध सीबीआय तपासाला परवानगी दिली. त्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डी.के.शिवकुमार यांच्या विरोधात मागील सरकारने दिलेला आदेश मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.


Recent Comments