Belagavi

ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूलमध्ये नृत्य, वेशभूषा स्पर्धा

Share

बेळगावातील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरशालेय वेशभूषा व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेच्या व्यवस्थापक भक्ती देसाई आणि श्री राजमाता सोसायटीच्या संचालिका कु. रुपाली जनाज, राजमाता सोसायटीच्या अध्यक्षा प्रतिभा नेगीनहाळ आणि प्रसिद्ध नृत्य कलाकार गणेश अशोक पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी विविध शाळातील बालकलाकारांनी आकर्षक नृत्य व वेशभूषा सादर करून सर्वांची मने जिंकली.
प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका फरीदा मिर्झा, संध्या सुतकट्टी, शीतल पाटील, क्रिस्टीना या सांस्कृतिक संघटनेच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका जाधव, पालक, शिक्षक व स्पर्धक उपस्थित होते.

Tags: