बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील संपगावी गावात विद्यार्थी व अभाविप संघटनेच्या वतीने शासकीय बसेस अडवून आंदोलन करण्यात आले.

संपगावी येथील विध्यार्थ्यांना या, गावातुन , शासकीय महाविद्यालयात जाण्यासाठी योग्य प्रकारे बसची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे . अनेकदा संबंधितांच्या निदर्शनास ही बाब आणून , बसेसची मागणी करून देखील काहीच उपयोग झाला नाही . अखेर विध्यार्थ्यानी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली शासकीय बस तसेच अन्य वाहने रोखून धरून आंदोलन केले . यावेळी विद्यार्थ्यांनी मागणीच्या पूर्ततेसाठी रत्यावर ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी केली .
यावेळी बोलताना संपगावी येथील अभाविपच्या प्रमुखाने सांगितले कि , स्थानिक आमदारांना अनेकदा बस असुविधेमुळे विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्या निदर्शनास आणून दिल्या आहेत . मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही . त्याचप्रमाणे केएसआरटीसी विभागाचे व्यवस्थापक आणि संबंधितांना देखील अनेकदा निवेदन दिले ,. त्यांनी बसची व्यवस्था करतो असे सांगितले मात्र ते आश्वासनच ठरले . या भागातील अनेक सरकारी कर्मचारी , विद्यार्थी बसवरच अवलंबून आहेत . बस सुविधा नसल्याने आम्ही आज हे आंदोलन करीत आहोत . पुरेशी बससुविधा देईपर्यत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही . या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .


Recent Comments