राज्योत्सवाच्या कार्यक्रमात राजकारण आणि भेदभाव दाखवणे योग्य नाही, असे उद्योगपती पृथ्वी कत्ती यांनी सांगितले. ते आज हुक्केरी शहरात कन्नड राज्योत्सव उत्साही समितीने आयोजित केलेल्या राज्योत्सव कार्यक्रमात बोलत होते.

माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन रमेश कत्ती यांच्या नेतृत्वाखालील राज्योत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ हुक्केरी हिरे मठाचे चंद्रशेखर महास्वामी आणि क्यारगुड्ड येथील अभिनव मंजुनाथ महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत आडवी सिद्धेश्वर मठाच्या प्रांगणात नाडदेवता भुवनेश्वरी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला .
प्रसारमाध्यमांशी बोलताना, पृथ्वी कत्ती म्हणाले कि , हुक्केरी तालुका औद्योगिक क्षेत्रासह विकासाच्या मार्गावर आहे, आणि कर्नाटक राज्योत्सवादरम्यान राजकारण करून देशाचा विश्वासघात करू नये, असे सांगितले
भूमी , भाषा , जल , आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ , ढोल , 20 हून अधिक कला पथकांची कला सादर करणारी मिरवून काढण्यात आली .
हिरेमठ येथील चंद्रशेखर महास्वामी यांनी बोलतांना सांगितले की, सीमाभागात कन्नड उपक्रम वाढत आहेत ही चांगली बाब आहे, मात्र शासनाने सीमाभागाच्या विकासाला अधिक महत्त्व देऊन अनुदान देऊन विकास करणे गरजेचे आहे.
दुपारी कोर्टसर्कलजवळील ग्रँड डॉल्बी (डीजे) मिरवणुकीत तालुक्यातील विविध गावांसह बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातील १० हजारांहून अधिक तरुण सहभागी झाले होते.
संस्मरणीय राज्योत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मार्ग, मोक्याची ठिकाणे विद्युत रोषणाई आणि माळांनी सजविण्यात आली होती, कट-आउट-बॅनर्स लावले होते, प्रत्येक घरावर कन्नड ध्वज फडकवले होते आणि शहर वधूप्रमाणे सजवण्यात आले होते.
यावेळी नगरपरिषदेच्या माजी अध्यक्ष जयगौडा पाटील, ए.के.पाटील, सदस्य महावीर निलजगी, राजू मुन्नोली, भीमशी गोरखनाथ, मधुकार करणिंग, कुमार जुटाळे, हिरण्यकेशी कारखान्याचे संचालक अशोक पट्टणशेट्टी, , सुहास नूली, गुरुराज कुलकर्णी, रामनाथ पाटील, कृष्णा पाटील, सुभाष हवन्नवर, संतोष सुनगार, वैभव शिमोगीमठ, हलप्पा गडवर, मधुकर करनिंग, चन्नाप्पा गजबर आदी उपस्थित होते.


Recent Comments