नंदगड पोलिसांनी धडक कारवाई करत अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा ट्रक जप्त केला.

खानापूर तालुक्यातील बिडी गावातील सगरे क्रॉसजवळील नंदीहळ्ळी येथे अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळताच नंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांनी छापा टाकून धडक कारवाई केली. वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक क्रमांक केए 22 जी 8774 हा जप्त करण्यात आला.
एएसआय एच. श्रीनिवासन, हवालदार एनए. चंदरगी यांनी या कारवाईत सहभाग घेऊन ट्रक जप्त करून कायदेशीर कारवाई केली.


Recent Comments