Belagavi

खाऊ कट्ट्यावरील ‘पीडब्ल्यूडी’च्या कारवाईचे स्वागत : राजू टोपन्नावर

Share

बेळगाव येथील गोवावेस जगज्योती बसवेश्वर सर्कलमधील खाऊ कट्ट्यातील दुकानांच्या वाटपात ज्यांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करून शासकीय मालमत्तेचा गैरवापर केला, त्यांचे ‘पीडब्ल्यूडी’च्या कारवाईने धाबे दणाणले आहे. या चौकशीत त्यांचा खरा रंग उघड होईल, असे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपन्नावर यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रसिध्दी पत्रकात राजकुमार टोपन्नावर यांनी म्हटले आहे की, नाल्यालगत खाद्यपदार्थांचे स्टॉल असलेला खाऊ कट्टा बांधून न्यायालयाच्या वैध आदेशाचे उल्लंघन केले आहे. भाजप कार्यकर्त्यांना केवळ नावावर स्टॉलचे वाटप करून दुकानदारांकडून भाडे वसूल करणारे कोण? दुकान कोणाला दिले आहे. आता दुकाने कोण चालवत आहेत? हे चौकशीत स्पष्ट होईल. मग बेळगावच्या जनतेला कळेल की अधिकारी चौकशीसाठी आले तेव्हा तेथील दुकानातील क्यूआर कोड कोणी गायब केले? या सगळ्यामागे कोण आहे हे बेळगावच्या जनतेला माहीत आहे, अशी टीका त्यांनी आमदार अभय पाटील यांच्यावर केली आहे.

Tags: