खानापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेत आग लागली असून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती खानापूर पोलीस ठाण्याचे पीएसआय गिरीश एम. यांनी दिली.

होय, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री किती वाजता आग लागली हे कळू शकले नाही. मात्र मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यात आली असून आतमध्ये धुराचे लोट पसरल्याने अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून आग विझवण्यासाठी धडपड करत आहेत.
आगीत बँकेचे संपूर्ण फर्निचर, कागदपत्रे, संगणक व इतर वस्तू जळून खाक झाल्याची शक्यता आहे. ज्या स्ट्राँग रूममध्ये पैसे ठेवले होते, त्याला आग लागली नसल्याचे कळते. आग पूर्णपणे विझल्यानंतरच नुकसानीचे प्रमाण समजेल. आतील भागात धुराचे लोट पसरत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वपोलीस कर्मचारी जयराम हमन्नवर, बसवराज तेगूर, अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.


Recent Comments