चिक्कोडी तालुक्यातील बावनसौंदत्ती गावासाठी नियोजित वेळेत बस वाहतूक व्यवस्था करावी, या मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीने चिक्कोडी केएसआरटीसी विभागीय अधिकाऱ्यांना दिले.

दररोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि अंकली, चिक्कोडी व इतर शहरात विविध व्यवसायासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना बस अभावी अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रत्येकाच्या सोयीची वेळ ठरवून दररोज योग्य वेळी बस वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.चिक्कोडी, अंकली, सवदत्ती , डिगेवाडी, जलालपूरमार्गे रायबागला नवीन बस सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली.यावेळी ग्रामचंद्र काटे, रमजान मकानदार , अनिल हंजे, श्रीकांत मंगसुळे, श्रीकांत तेली आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


Recent Comments