ब्लूटूथ डिव्हाइस वापरून कर्नाटक परीक्षा प्राधिकरण (KEA) भरती परीक्षा लिहिण्याच्या बेकायदेशीर प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे कनेक्शन बेळगावपर्यंतही पसरले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील , अथणी तालुक्यातील, कर्नाटक पाटबंधारे महामंडळ कार्यालयातील सहाय्यक अभियंता, रुद्रगौडा एम.एम.याना प्रमुख आरोपी आर डी पाटील याच्यासाठी काम केल्याच्या आरोपावरून सीआयडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
रुद्रगौडा हे गेल्या तीन वर्षांपासून हिप्परगी जलाशयाच्या पुनर्वसन आणि पुनर्रचना उपविभागीय कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
मूळचे कलबुर्गी जिल्ह्यातील जेवरगी तालुक्यातील नेलोगी येथील रहिवासी असलेले रुद्रगौडा, गेल्या ९ तारखेपासून कार्यालयात गैरहजर होते. रुद्रगौडा यांच्यावर बेळगाव जिल्ह्यातील उमेदवारांना परीक्षेत मदत केल्याचा आरोप आहे. पैसे घेऊन , रुद्रगौडा हे आर.डी.पाटील यांच्यासोबत उमेदवारांचे सौदे करत असल्याचा आरोपही ऐकायला मिळत आहे
रुद्रगौडा यांनी 17 हून अधिक उमेदवारांचे तिकीट आधीच गोळा करून आर डी पाटील यांना दिले असल्याची माहिती आहे. परीक्षेच्या काळात आर.डी.पाटील , रुद्रगौडा यांच्या सतत संपर्कात होते . . या पार्श्वभूमीवर सीआयडी पोलिसांनी रुद्रगौडा यांना ताब्यात घेतले असून पोलिसांची चौकशी सुरू आहे.


Recent Comments