Belagavi

अरिहंत हॉस्पिटलमध्ये दोन नवजात शिशुंवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

Share

आजकाल शस्त्रक्रिया म्हटले कि सर्वजण घाबरून जातात. पण, लहान मुलांची शस्त्रक्रिया म्हटले की अंगावर शहारेच येतात. पण अरिहंत हॉस्पिटलमध्ये नुकताच 10 दिवसांच्या व 30 दिवसाच्या बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील 10 दिवसांच्या बालकावर इंटरप्टेड आयोर्टिक आर्च रिपेयर (टाईप-2) व इराकमधील 30 दिवसांच्या बालकावर कोअरकेशन आयोर्टिक रिपेअर व पीडीए लायगेशन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. याद्वारे कोलमडून गेलेल्या पालकांना अरिहंत हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या रुपात भेटलेल्या देवदूतांनी धीर देऊन अवघ्या 10 दिवसांच्या व 30 दिवसाच्या नवजात बालकांवर शस्त्रक्रिया करण्याचा नाजूक निर्णय यशस्वीपणे अमलात आणला. सदर 10 दिवसांचे बाळ दक्षिण गोवा येथील केपे व अवघ्या 30 दिवसांचे बाळ इराकमधील बगदाद येथील रहिवासी आहे.

डॉ. अभिषेक जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे व सहकाऱ्यांनी या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. हॉस्पिटलचे चेअरमन सहकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बालकांच्या प्रकृतीची विचारपूस करून शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांचे कौतुक केले.

Tags: