कर्नाटकच्या एकीकरणात कित्तूर कर्नाटकचे योगदान अविस्मरणीय आहे असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
धारवाडमधील कर्नाटक विद्यावर्धक संघाच्या वतीने नाडोज डॉ. पाटील पुट्टप्पा सभा भवन येथे आयोजित 68 व्या कर्नाटक राज्योत्सव आणि “कर्नाटक संभ्रम-50” च्या उत्सवात सहभागी होऊन मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या. यावेळी त्यांनी कित्तूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक दोड्डभावेप्पा चन्नबसप्पा मूगी भवनाचे उदघाटन आणि ‘दोड्डभावेप्पा चन्नबसप्पा मूगी-एक ऐतिहासिक दृष्टिकोन’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.
मंत्री हेब्बाळकर पुढे म्हणाल्या की, कन्नड एकीकरण्याच्या चळवळीत बेळगाव, धारवाड, गदग हे भाग आघाडीवर होते. जर दोड्डभावेप्पा मूगी यांनी कित्तूरचा इतिहास लिहीला नसता तर आपल्या सर्वांना राणी चन्नम्मा यांचा इतका परिपूर्ण इतिहास समजला नसता. त्या काळात कोणत्याही सुविधा नसताना त्यांनी केलेले हे कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सर्वजण चन्नम्माच्या इतिहासाने प्रेरित होऊन मोठे झालो. फारसे शिक्षण घेण्याची संधी मिळाली नसली तरी नंतर वाचन-ऐकून थोडेफार शिकले, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments