कर्नाटक विधीमंडळाचे 10 दिवसांचे हिवाळी अधिवेशन येत्या 4 ते 15 डिसेंबर दरम्यान बेळगावातील सुवर्ण विधानसौधमध्ये होणार असल्याची घोषणा विधानसभा सचिवांनी केली आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होणार असून, शनिवार व रविवार सुटी वगळता दहा दिवस अधिवेशन चालणार आहे. सोळाव्या विधानसभेचे दुसरे अधिवेशन बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
कर्नाटक विधानसभेची बैठक 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुवर्ण विधानसौध, बेळगाव येथे होणार आहे. सोळाव्या विधानसभेच्या दुसऱ्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज 4 डिसेंबरपासून 15 डिसेंबर दरम्यान भरवण्याचे निश्चित केले आहे. अधिवेशनात सार्वजनिक हिताचे प्रश्न, सूचना या नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून परवानगी दिली जाते.
विधानसभेच्या कार्यपद्धती आणि आचार नियमांनुसार, अधिवेशन कालावधीत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांसह एका दिवसात जास्तीत जास्त पाच प्रश्नांना परवानगी देण्यात येणार आहे. गटनिहाय ठरलेल्या शेवटच्या तारखेला दुपारी 3 वाजताच्या आतच प्रश्नपत्रिका काढता येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.


Recent Comments