Belagavi

काकती येथे वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांची २४५ वी जयंती

Share

बेळगाव तालुक्यातील काकती गावात , वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांची २४५ वी जयंती साजरी करण्यात आली . व्हॉइस ओव्हर : मंगळवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात , काकती येथील राणी चन्नम्मा यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले . राणी चन्नम्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी चन्नम्मा उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.एस.डी.पाटील यांनी चन्नम्मा यांच्या 245 व्या जयंतीबद्दल सांगितले.देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला सेनानी चन्नम्मा यांचा जन्म काकती येथे झाला. महिला व विद्यार्थिनींना त्यांनी चन्नम्मासारखे धैर्य आणि शौर्य अंगीकारण्याचे आवाहन केले. तसेच नेगीलयोगी संघटनेचे प्रमुख धर्मराज गौडर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

यावेळी त्यांनी आगामी वर्षासाठी काकती येथे चेन्नम्मा यांच्या जयंतीनिमित्त 10,000 रुपये देणगी देण्याची घोषणा केली. हुबळी येथील शकुंतला शेट्टी, हेमा कजागर , शशिकांत पाटील, बाबासाहेब देसाई, आर.के. पाटील, बाबासाहेब शंकर गौडा देसाई आणि शासकीय मॉडेल वरिष्ठ कन्नड प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: